नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू ?
नाप्ता साठवणुकीचा परवाना नसताना देखील मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लिमिटेड या कंपनीचा नाप्ता साठवणुकीचा व्यवसाय चालू?

स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक शासकीय कागदपत्रांच्या विसंगत अहवाल सादर करून कंपनीस बेकायदेशीरपणे परवाना देण्याचा घाट. 

उरण (सुनिल ठाकूर ). मौजे नवघर ता. उरण जि. रायगड नवी मुंबई येथे इंडियन ऑइल टँकिंग लिमिटेड ही कंपनी सिडको च्या मालकीच्या सुमारे सत्तावन एकर जागे मध्ये व्यवसाय करीत आहे.. मात्र वरील कंपनीने सिडको च्या जागे मध्ये व्यवसाय करताना सिडको कडून भोगवटा प्रमाणपत्र न घेताच सिडको च्या जागे मध्ये व्यवसाय चालू केलेला आहे. म्हणून सिडको ने इंडियन ऑइल टँकिंग कंपनी विरोधात कारवाई चालू केल्या नंतर वरील आय. ओ. टी. कंपनी विरोधात सुमारे पाच शे ते सहाशे कोटी रुपये इतका दंड आकरण्यात येणार असल्याचे निष्पन्न झालेआहे. त्यामुळे सदर कंपनीने कंपनीचे नाव बदलून मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लि.असे ठेवले आहे. सदर मे. इंडियन ऑइल अदानी व्हेन्चर्स लि. या कंपनीने कंपनी च्या नावाने नाप्ता साठवणुकीचा परवाना मिळावा म्हणून ऑगस्ट 2023 मध्ये शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. शासनाच्या जी आर मध्ये परवाना संबंधी चा प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्या नंतर त्या वरती 45 दिवसात निर्णय घेणे बंधन कारक आहे असे म्हटलेले असताना सुद्धा प्रस्तावा मध्ये त्रुटी असून प्रस्तावा सोबत आवश्यक असलेले कागद पत्र कंपनीने सादर केलेले नसताना सुद्धा प्रस्ताव सादर झाल्या नंतर सुमारे 10 महिने होऊन देखील प्रस्तावा विषयी निर्णय घेण्यात आलेला नाही. किंवा कंपनीस परवाना मंजूर केलेला नाही. त्यामुळे सदर प्रस्तावा संदर्भात प्रलंबित ठेवलेला निर्णय हा जाणीव पूर्वक संबंधित कंपनी च्या बेकायदेशीर पणे चालू असलेल्या व्यवसायास कायदेशीर संरक्षण मिळावे म्हणून शासना कडून व जिल्हाधिकारी कार्यालया कडून जाणीव पूर्वक,मुद्दाम हुन चाल ढकल पणा चालू आहेअशी जनते मध्ये चर्चा चालू असून दरम्यान च्या काळात जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या कार्यालया कडून उपलब्ध शसकीय कागद पत्र व सत्य परिस्थिती यांच्या विसंगत असे आवाहल शासनाकडे सादर करून कंपनीस नियम बाह्य बेकायदेशीर पणे परवाना देण्या विषयी शिफारस केलेली आहे. त्यास देखील संबंधीत तक्रार दार श्री राम पाटील व नागरिकांनी हरकत घेऊन संताप व्यक्त केला असून संबंधीत अधिकारी व कंपनी विरोधात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. आता पुढे शासना कडून कधी व काय कारवाई करण्यात येते याकडे उरण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
टिप्पणियाँ
Popular posts
महिला पुलिस के लिए चलता फिरता विश्रामिका, पुलिस आयुक्त की हो रही है सराहना।
चित्र
भिवंडी वाडा रोड पर भंगार माफिया का तांडव
चित्र
आमदार अण्णा बनसोडे यांना साकडे.
चित्र
सीलाई मशीन को कोई नही दे रहा है भाव निलेश भाऊ चले जाव गाव
चित्र